आमच्या गावाबद्दल
आमच्याबद्दल
कटगुण हे गाव महात्मा फुले यांची कुलभूमी असून ग्रामपंचायत कटगुण ची स्थापना ५ मे १९५२ साली झाली महसुली क्षेत्र कटगुण आहेत.वर्ष 2011 जनगणनेनुसार कटगुण गावची लोकसंख्या ३३१९ (अनुसूचीत जाती ४४७ लोकसंख्या व इतर २८७२ लोकसंख्या) असुन कुटूंब संख्या ७५८ आहे. गावचे एकुण भौगोलिक क्षेत्र १३८५ हे. आहे. जनगनणा 2002-2007 नुसार दारिद्र्य रेषेखालील ११३ कुटूंबे आहेत. गाव हे वाडी वस्त्याने विभागले गेले आहे. प्रमाण साधारनपणे ७५.७२ टक्के असल्याने गावातील साधारन १५२ कुटूंब संख्या हे प्राथमिक शिक्षक, महसुल ,आरोग्य, सैन्यदलात , प्रशासकीय कार्यालयात कार्य करित आहे

स्थान आणि दळणवळण
कटगुण गाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे पोहोचण्यासाठी प्रमुख मार्ग म्हणजे खटाव शहरातून कटगुणकडे जाणारा पक्का रस्ता. खटावहून गावाचे अंतर सुमारे १० किमी आहे. येथे एस.टी. बससेवा तसेच खासगी जीप आणि रिक्षा सहज उपलब्ध आहेत. जवळचे रेल्वे स्टेशन कराड असून तेथून बस किंवा टॅक्सीने खटावमार्गे कटगुण येथे पोहोचता येते. गावाकडे जाणारा रस्ता सर्व ऋतूंमध्ये वाहतुकीसाठी सोयीस्कर आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर दिशादर्शक फलक असून प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक माहिती दिलेली आहे.
जवळचे शहर
सातारा ४० कि.मी
रेल्वे स्टेशन
कोरेगाव १९ कि.मी
विमानतळ
पुणे १५२ कि.मी



आमच्या गावातील शाळा
गावाच्या शैक्षणिक प्रगतीचा आधारस्तंभ असलेल्या आमच्या शाळा
ग्रामपंचायत सदस्य
गावाच्या विकासासाठी न थकता कार्य करणाऱ्या आमच्या समर्पित नेत्यांना भेटा
श्री.रमेश बबन होवाळ
ग्रामपंचायत अधिकारी
संपर्क माहिती
श्री जयदीप साहेबराव गायकवाड
उपसरपंच
संपर्क माहिती
